Terrorists Arrested in Pune | कोथरुड ‌भागातून अटक केलेल्या दहशतवाद्यांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Terrorists Arrested in Pune | वाहन चोरी करताना पकडण्यात आलेल्या दोघांना कोथरुड पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या सोखोल चौकशीत ते दहशतवादी (Terrorists Arrested in Pune)असल्याची माहिती समोर आली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिरादार (First Class Magistrate A. C. Biradar) यांनी 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.(Pune Crime News)

 

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी Mohammad Yunus Mohammad Yaku Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam (वय 31) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. (Terrorists Arrested in Pune)

 

या प्रकरणात अटक करण्यात आलेले इम्रान खान,
युनूस साकी यांना कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील
(Senior PI Hemant Patil) यांनी न्यायालयात हजर केले. बनावट आधार कार्ड
(Fake Aadhaar Card) तयार करणे, शस्त्र बाळगणे यासह विविध कलमांन्वये दोघांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात
(Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरोपींकडून बनावट आधार कार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या,
पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकिट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती
सहायक सरकारी वकील ॲड. रेणुका देशपांडे (Adv. Renuka Deshpande) यांनी युक्तीवादात केली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिरादार यांनी दोघांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 

Web Title : Terrorists Arrested in Pune | Arrested terrorists from Kothrud area in police custody

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terrorists Arrested in Pune | कोथरूडमधून अटक केलेले 2 दहशतवादी दीड वर्षापासून पुण्यात वास्तव्यास; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती (Video)

Pune Police News | NIA कडून फरार घोषित केलेल्यांच्या मुसक्या आवळणार्‍या पोलिसांचा CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांच्याकडून सन्मान (Video)

Pooja Hegde | अभिनेत्री पूजा हेगडेच्या डीप नेक बॉडीकॉन ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष