Pune Police News | NIA कडून फरार घोषित केलेल्यांच्या मुसक्या आवळणार्‍या पोलिसांचा CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांच्याकडून सन्मान (Video)

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Police News | राष्ट्रीय तपास संस्थेने National Investigation Agency (NIA) फरार घोषित केलेल्या मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी Mohammed Yunus Mohammed Yaku Saki (24) आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान

Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा (Mitha Nagar Kondhwa). मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश – Ratlam, Madhya Pradesh) यांच्या कोथरूड पोलिस स्टेशनमधील (Kothrud Police Station) बीट मार्शल प्रदीप चव्हाण (Police Pradeep Chavan) आणि अमोल नजन (Police Amol Najan) यांनी पेट्रोलिंग दरम्यान मुसक्या आवळल्या. त्याबद्दल पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी दोन्ही बीट मार्शलसह पोलिस पथकातील इतर पोलिस अंमलदार, पोलिस उपनिरीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपायुक्तांचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान केला आहे. (Pune Police News)

 

पोलिस उपायुक्त सुहेश शर्मा (IPS Suhail Sharma), वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील (Sr PI Hemant Patil), पोलिस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी (PSI Pravin Kulkarni), पोलिस अंमलदार प्रदिप चव्हाण, अमोल नजन, बाला रफी शेख (Police Bala Rafi Shaikh), अनिकेत जमदाडे (Police Aniket Jamdade), ज्ञानेश्वर पांचाळ (Police Dnyaneshwar Panchal), वैभव शितकाल (Vaibhav Shitkal) यांच्या पथकाचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांच्या घरझडतीमध्ये एक जिवंत काडतुस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर महत्वाची कागदपत्रे मिळुन आली आहेत. त्यांचा देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आहे. (Pune Police News)

 

याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात भादंवि 468, 379, 511, 34,
भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), 4(25), महाराष्ट्र पोलिस अ‍ॅक्ट क 37(1), 37(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पथकातील सर्वांचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान केला.
तसेच यापुढे देखील त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी यासाठी मार्गदर्शन केले आहे.

 

 

Web Title : Pune Police News | CP Ritesh Kumar, Jt CP Sandeep Karnik honor the grinning cops declared absconders by NIA

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा