Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Crime | आयटी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीरिक संबंधाची (Demand Of Physical Relationship) मागणी करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका आयटी इंजीनिअरवर (FIR On IT Engineer) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 ते 28 मार्च या कालावधीत कंपनीच्या पार्कींगमध्ये घडला आहे.

याबाबत 32 वर्षीय महिलेने (सध्या रा. पुणे मुळ रा. सातारा) कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ऋषिकेश सुनील धिवर Rishikesh Sunil Dhivar (वय-32 रा. गणेश नगर, डांगे चौक, थेरगाव) याच्यावर आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोथरुड परिसरातील आयटी कंपनीच्या कॉलसेंटरमध्ये काम करते. तर आरोपी धिवर हा IT इंजिनिअर आहे.(Pune Kothrud Crime)

फिर्यादी 13 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी कंपनीच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये आल्या.
त्यावेळी फिर्यादी यांच्या ओळखीचा आरोपी ऋषिकेश धिवर त्याठिकाणी आला.
मला व माझ्या मित्राला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत असे म्हणून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…