Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी

मुंबई : Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील जागावाटप होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) नाराजी व्यक्त केली आहे. विचारत न घेता परस्पर जागावाटप होत असल्याचे वंचितने एक्स सोशल साईटवर पोस्ट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.(Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi)

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघात खासदार ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी घोषित केली आहे.

तिकडे, शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंची उमदेवारी घोषित केली आहे. या उमेदवारांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. यावरून काँग्रेस आणि वंचितने नाराजी व्यक्त केली आहे.

वंचितने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे,
हे तुम्हाला मान्य आहे का? काल सुप्रिया सुळे यांना बारामतीतून आणि शिवसेना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबईमधून
अमोल किर्तीकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. अशा पद्धतीने आघाड्या चालतात का? मविआतील पक्ष आघाडी
म्हणून नाही तर एकटेच निर्णय का घेत आहेत?

यामध्ये पुढे म्हटले आहे की, तुम्ही आम्हाला सर्व अंतर्गत चर्चा आणि बैठकांपासून दूर ठेवत आहात.
पण, निदान चर्चा करून आणि आघाडी म्हणून उमेदवार जाहीर करा.

वंचितने पुढे म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की, वरील मुद्द्यांवर सर्वजण एकत्र बसून समाधान निघेल.
आम्ही पुन्हा अधोरेखित करत आहोत की, आम्ही महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक आहोत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी
जाहीर केल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज झाले आहेत.
ते ते शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरून निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदार संघातील मविआचा उमेदवार ठरला, पण महायुतीत रस्सीखेच सुरूच

उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली, वायकरांपाठोपाठ काँग्रेसचे निरुपम देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

Pune News | महाराष्ट्र्र गुजराती समाज महामंडळाच्या महामंत्री पदी पुण्याचे राजेश शहा यांची फेरनिवड !

Sanjay Nirupam May Join Shivsena | उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली, वायकरांपाठोपाठ काँग्रेसचे निरुपम देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

Pune Hadapsar Crime | पुणे : डिलेव्हरी बॉयला लुटून परिसरातील वाहनांची तोडफोड, दहशत पसरवणाऱ्या चार जणांवर FIR (Video)