Prakash Ambedkar On PM Narendra Modi | मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा आम्हाला फायदा होईल, प्रकाश आंबेडकरांचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Prakash Ambedkar On PM Narendra Modi | पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निकाल हे घासून लागतील. आम्हाला मात्र फायदा होईल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्पात आम्हाला जास्त जागा मिळणार असा दावा भाजपासुद्धा करताना दिसत नाही. नरेंद्र मोदींच्या सभांचा काही फायदा होणार नाही. उलट मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील, तेवढा आम्हाला फायदा होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi-VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.(Prakash Ambedkar On PM Narendra Modi)

प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये २०१४ मध्ये भाजपला जे एक लाख दीडलाख मतदान मिळाले होते, तसे यंदा दिसत नाही. २०२४ मध्ये तरुण मतदार भाजपकडे आहे असे दिसत नाही, असा दावा आंबेडकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. हे कमी झालेले मतदान भाजपचे आहे. त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल. त्यामुळेच भाजप कुठेही आमचं वर्चस्व असल्याचे म्हणत नाही. काही ठिकाणी काँग्रेस आणि काही ठिकाणी भाजप यांच्यात लढत होत आहे. जो कुणी जिंकेल तो २५ हजारांच्या फरकाने जिंकेल, असा अंदाज आंबेडकर यांनी वर्तवला.

तर बारामतीमधील लढतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसला लोकांचा चांगला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आता मुस्लिम मतांकडे वळली आहे. आम्ही काँग्रेससोबत आहोत आम्हाला मतदान करा, असे ते म्हणत आहेत. मात्र तुम्ही विधानसभेला काँग्रेससोबत राहणार का? असे लोक विचारत आहेत.

१२ मतदारसंघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अशी लढत आहे.
याचा आम्हाला फायदा होताना दिसत आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जयंत पाटील (Jayant Patil)
यांनी आवाहन केल्यामुळे बारामतीत उमेदवार (Baramati Lok Sabha) दिला नाही, असा खुलासा आंबेडकर यांनी केला.

तर भाजपाने उत्तर-मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी दिली, याबाबत
प्रकाश आंबेडकर म्हणाले, माणूस म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही.
लोकांना त्यांच्या माध्यमातून एक चॉईस आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती