Prakash Ambedkar | ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, ‘हे’ कारण सांगत प्रकाश आंबेडकरांनी दिले स्पष्टीकरण

अकोला : Prakash Ambedkar | अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झालेला नाही. कारण वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचे असेल तर काँग्रेसच्या (Congress) वरच्या नेतृत्वाने मान्यता दिली पाहिजे. हायकमांडने तशी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही, असा खुलासा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आंबेडकर यांच्या या खुलाशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केल्याचे काल मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले होते. ही बैठक सुरू असतानाच या संदर्भातील पत्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

या पत्रकावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नसल्याचे आज प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमच्याशी पत्रव्यवहार करतात. परंतु, वंचितच्या मविआतील समावेशाबाबतचा निर्णय काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात घेतील, असे आम्हाला समजले आहे. ज्या पत्रकाबद्दल सध्या चर्चा चालू आहे त्यावर केवळ नाना पटोले यांची सही आहे. त्यावर थोरात आणि चव्हाण यांची सही नाही.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या
प्रकारावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्हाला तिथे कशी वागणूक मिळाली याची आम्ही मोठी
समस्या निर्माण करणार नाही. मीपणा आणि भाजपा-आरएसएसचे सरकार उलथून टाकणे यापैकी एका
गोष्टीला प्राथमिकता द्यायची असेल तर आम्ही भाजपा-आरएसएसचे सरकार उलथून टाकण्याला अधिक महत्त्व देऊ.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे स्थानबद्ध कारवाईचे शतक, आयुक्तांची एका वर्षात ऐतिहासिक कामगिरी

डेटिंग ॲपवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीला 27 लाखांचा गंडा

पुणे : जागा विक्रीच्या बहाण्याने महिलेची 1 कोटीची फसवणूक, वकिलासह चार जणांवर FIR; दोघांना अटक

दोन कंपन्यांनी एकाच वितरकाला घातला गंडा ! हाय स्पीड मोटार लावून लो स्पीड ई दुचाकी असल्याचे सांगून केली फसवणूक

Shiv Sena Shinde Group | मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, ”छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा”