Prakash Ambedkar | मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचे महत्वाचे वक्तव्य, ”शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजपचा अन्…”

वाशिम : Prakash Ambedkar | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातील कराराने दोन बळी घेतले आहेत असे मी मानतो. एक बळी भाजपचा (BJP) गेला आहे आणि दुसरा जे सरंजामी पुढारी होते, ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत, ते आता बोल्ड आऊट झाले आहेत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात जो समझोता झाला. त्या समझोत्यामुळे ओबीसींचा असा समज झाला आहे की, भाजपने आम्हाला फसवले. धर्माचा प्रचार करून आमची मते त्यांनी घेतली. पण, आमचे रक्षण भाजपने केले नाही. म्हणून, ओबीसी पूर्णपणे भाजपपासून तुटलेला आहे.

आंबेडकर म्हणाले, भाजपला घटना मोडीत काढायची आहे. म्हणून जे कोणी घटना मोडीत काढायला निघाले आहेत ते
त्यांच्या जवळचे आहेत.

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर महायुतीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मात्र, मराठा आरक्षणाच्या निर्णयावरून महायुतीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरू आहे.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य यादृष्टीने महत्वाचे मानले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दर महिन्याला 8-9 टक्के परताव्याचे आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक, कोंढव्यातील सलमान शिरोळकर याच्यावर MPID

‘माझ्याकडे का बघतो’ तरुणाला दगडाने मारहाण, ताडीवाला रोड येथील प्रकार

Pune News | ज्ञान-भक्ती -संस्कृतीचा पुण्यात अनोखा महोत्सव ! 5 फेब्रुवारीपासून चार दिवस श्री श्री रविशंकर पुणे दौऱ्यावर

Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार