Prakash Javadekar | लोकसभा निवडनुकीचा संग्राम हा देश एकसंघ मानणारे विरुध्द देशाचे उत्तर दक्षिण असा भेद करणार्‍यांमध्ये; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

Prakash Javadekar | The battle of Lok Sabha elections between those who consider the country as one unit and those who divide the country into North and South; Former Union Minister Prakash Javadekar

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha | लोकसभेची निवडणूकाचा संग्राम हा देश एकसंघ मानणारे विरुध्द देशाचे उत्तर दक्षिण असा भेद निर्माण करणार्‍यांमध्ये आहे. राष्ट्र प्रथम विरुध्द परिवार प्रथम मानणार्‍यांमध्ये हा संघर्ष असल्याचे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर, सहप्रसिध्दी हेमंत लेले, पुष्कर तुळजापुकर यावेळी उपस्थित होते.(Prakash Javadekar)

जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षामध्ये केलेल्या कामामुळे देशाची आर्थिक प्रगती झाली आहे. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहचल्या आहेत. त्यामुळे मोदींवर लोकांचा विश्‍वास अधिक वाढला असल्यामुळे यावेळी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला मोठे बहुमत मिळणार आहे. देशामध्ये रेल्वे, बंदरे, जलमार्ग आणि विमानतळे अशा पायाभुत सुविधांमध्ये मोदी सरकारने मोठे काम केले आहे. देशात प्रत्येक कुटूंबापर्यंत विकास पोहचला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

देशामध्ये 77 लाख लोकांकडे आज इंटरनेटची सुविधा आहे. जगात सर्वात स्वस्त डेटा हा भारतात मिळतो.
नागरिकांच्या थेट खात्यामध्ये विविध योजनांचे पैसे जमा केले जातात.
34 लाख कोटी रुपये मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात जमा केले त्यामुळे मोदींना मत जनता देणार आहे.
35 कोटी युवक आणि महिलांना मुद्रा कर्ज योजनेमुळे 20 कोटीहून अधिक रोजगार निर्माण झाले.
यामध्ये देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली असल्याचे जावडेकर म्हणाले.

विरोधी पक्ष सध्या एनडीएला 272 पर्यंत रोखण्याची भाषा करत आहे.
त्यांच्यामध्ये निराशा असून पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा प्रकारची विधाने केली जातात. विरोधक खोटा प्रचार करत आहेत. विरोधकांच्या प्रचाराला हितसंबधी गट देशातून आणि विदेशातूनही मदत करीत आहेत. एका टूलकिटनुसार त्यांचा प्रचार सुरु आहे, परंतू त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असे जावडेकर म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती