Prakash Shendge | प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा, ”कुणब्यांचे दाखले देणे बंद करा, नाहीतर…”

जालना : Prakash Shendge | कुणबी समाजाला देण्यात येत असलेले ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ थांबवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कुणब्यांचे दाखले ताबडतोब बंद करावे, नाहीतर २०२४ मध्ये सरकारला कुठे पाठवायचे हे ओबीसी समाज ठरवेल, असा इशारा माजी मंत्री प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी अंबड, जालना येथील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभेत दिला. यावेळी व्यासपीठावर, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांसह अनेक ओबीसी नेते होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) दंड थोपटले आहेत. आज अंबडमध्ये भुजबळांसह येथे जमलेल्या विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर घणाघती टीका केली. प्रकाश शेंडगे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) वाटत थांबवा, असा इशारा दिला. त्यामुळे राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद चिघळत चालल्याचे दिसत आहे.

अंबडच्या सभेत मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) म्हणाले, जरांगे पाटील, सभा मोठ्या घेतल्याने आरक्षण मिळत नसते. तुम्ही भुजबळांकडे या ते तुम्हाला आरक्षणाचा मार्ग दाखवतील. भुजबळ जरी म्हातारे झाले असले तरी ते सिंह आहेत. एका फटक्यात तुमच्यासारखे ५० मातीमोल करायची ताकद भुजबळांच्या पंजामध्ये आहे.

शेंडगे म्हणाले, माझ्यासारखे असंख्य शिलेदार भुजबळ साहेबांच्या पाठिशी आहेत. त्यामुळेच, महाराष्ट्रात आता ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय हा समाज स्वस्थ बसणार नाही.

मराठा समाजाला आव्हान देताना प्रकाश शेंडगे म्हणाले, छगन भुजबळ यांनी
ओबीसींच्या बाजूने आवाज उठवला तेव्हापासून प्रस्थापित मराठा समाजाने खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका केली.
इतकेच नाही तर एकही मराठा त्यांना मतदान देणार नाही अशी भाषा करू लागला.
यापूर्वी असे कधी नव्हते. भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर,
मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार आहेत.

शेंडगे म्हणाले, जर भुजबळांना पाडण्याची भाषा होत असेल तर राज्यात ओबीसी समाजही ६० टक्के आहे.
प्रत्येक मतदारसंघात ओबीसी समाज आहे.
जर तुम्ही एक भुजबळ पाडणार असाल तर ओबीसी तुमचे १६० आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘वर्षा’ शेवटी…