Devendra Fadnavis | मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘वर्षा’ शेवटी…

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2023) लढवणार आणि दिल्लीतील राजकारणात जाणार, अशी चर्चा रंगली होती. यावरून पत्रकारांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारला की, पुढील दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर साजरी करणार? यावर त्यांनी म्हटले, मी पुढील दिवाळी ‘सागर’ बंगल्यावरच साजरी करणार आहे. ‘वर्षा’ शेवटी सागरालाच मिळते. गुरूवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. महाराष्ट्रातील राजकारणातच (Maharashtra Political News) राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, राजकारणात १० दिवसांनी काय होईल, हे माहिती नसते. पण, पुढील १० वर्षांनंतरही मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असेन आणि पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्यातील राजकारणात खूपच कटुता आली आहे. निवडणुकांच्या काळात ती वाढतच जाते. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर ती कमी होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपा (BJP)
कधीही तयार आहे. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)
प्रलंबित असल्याने निवडणुका स्थगित आहेत. त्या भाजपामुळे थांबलेल्या नाहीत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जो निकाल लागला आहे,
तोच या निवडणुकांमध्ये लागेल व भाजपाला घवघवीत यश मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याला वाहन चोरी प्रकरणी अटक, 8 दुचाकी जप्त, प्रचंड खळबळ