Pramod Nana Bhangire | उड्डाणपुलामुळे नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवा, नाना भानगिरे यांचे नितीन गडकरींना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pramod Nana Bhangire | हडपसरमधील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) आणि संत तुकाराम उड्डाणपूलामुळे (Sant Tukaram Flyover) नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष (Shinde Group Pune City President) नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना निवेदन दिले. (Pune News)

आपल्या नेतृत्वात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात विविध ठिकणी रस्ते (Road) आणि महामार्गाची (Highway) कामे अत्यंत वेगाने सुरु आहेत. अनेक वर्षे रेंगाळलेल्या रस्त्यांची कामे आपल्या नेतृत्वात कमी कालावधीत पूर्णत्वास येत आहेत, त्याबद्दल आपले सर्वप्रथम मनःपूर्वक आभार. (Pramod Nana Bhangire)

गेल्या कित्येक वर्षापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीला (Traffic Jam) सामोरे जावे लागत असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा (Chandni Chowk Flyover) प्रश्न आपण विक्रमी वेळेत सोडवला. नितीन गडकरीजी चांदणी चौकासारखाच वाहतुकीचा प्रश्न पुणे महानगरातील हडपसर उपनगरात असलेल्या संत ज्ञानेशवर आणि संत तुकाराम उड्डाणपूलामुळे नागरिकांना सतावतोय.

या उड्डाणलापासून राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक 65 (जुना क्रमांक 9) पुणे (Pune ) ते
मच्छलीपट्टणम (Machalipatnam) सुरु होतो या महामार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक,
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये जोडली गेली आहेत त्यामुळे या उड्डाणपुलावरून मोठया प्रमाणात सातत्याने
वाहतूक असते. मुळात एकच असलेल्या या पूलाला पुढे सासवड रस्त्यावर जाण्यासाठी वेगळा मार्ग बांधण्यात आला.
या जोडकामामुळे मुळातील पूल अत्यंत कमकुवत झाला आहे. परिणामी आठवड्यातील चार ते पाच दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Neem Health Benefits | ‘या’ झाडाची पानेच नव्हे, साल आणि बियासुद्धा चमत्कारी, 5 आजार करतात दूर, शरीर होते निरोगी

Ajit Pawar | मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर?, अजित पवार म्हणाले- ‘मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात…’ (व्हिडीओ)