Neem Health Benefits | ‘या’ झाडाची पानेच नव्हे, साल आणि बियासुद्धा चमत्कारी, 5 आजार करतात दूर, शरीर होते निरोगी

नवी दिल्ली : Neem Health Benefits | आयुर्वेदात अनेक झाडे आणि वनस्पती औषधी म्हणून वापरल्या जातात. यात पहिला नंबर कडुलिंबाच्या झाडाचा आहे. कडुलिंबाची चव जितकी कडू तितकेच ते लाभदायक आहे. अँटीबायोटिक तत्वांनी युक्त कडुलिंब आरोग्यासाठी खूप गुणकारी ठरते. या झाडाची पाने, फांद्या, साल आणि बिया अनेक आजारांवर औषध म्हणून काम करतात. कडुनिंबाच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी जाणून घेऊया. (Neem Health Benefits)

कडुलिंबाचे ५ चमत्कारिक फायदे

शरीर डिटॉक्सिफाय करा :

कडुनिंबात अँटी-इम्फ्लेमेटरी, अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. याच्या वापराने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढता येतात. रक्त शुद्ध होते आणि रक्ताभिसरण वाढते. (Neem Health Benefits)

इम्युनिटी मजबूत करा :

कडुलिंबाच्या नियमित सेवनाने इम्युनिटी वाढते. कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीवायरल गुणधर्म बॅक्टेरियाशी लढतात. यासोबत ते वायरल सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी शरीराला तयार करतात. या झाडाची पाने कोणत्याही मोसमात खाऊ शकता. ती खाल्ल्याने इम्युनिटी वाढते.

पचन सुधारणे :

कडुलिंबाचा थंड प्रभाव असल्याने ते आम्लपित्त, छातीत जळजळ आणि पचन सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहे. कडुलिंबाची पाने पाचन तंत्रातील हानिकारक विषारी द्रव्ये बाहेर काढून पोटाच्या समस्या दूर करतात.

जखमा वेगाने भरतात :

कडुनिंबात कोणतीही दुखापत किंवा जखम भरून काढणारे भरपूर गुणधर्म असतात. कडुनिंबात अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. फोड आणि पिंपल्सची समस्या टाळण्यासाठी कडुलिंबाची पाने, साल आणि फळे समप्रमाणात बारीक करून घ्या. यानंतर ही पेस्ट त्वचेवर लावा. यामुळे फोड आणि जखमा लवकर भरतात. ही पेस्ट रोज लावा.

डायबिटीज :

तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास डायबिटीजच्या
रुग्णांची इन्सुलिनची गरज ५०% पर्यंत कमी होते. असे केल्याने शुगर लेव्हल झपाट्याने कमी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर