Maharashtra Politics News | मनिषा कायंदेंनी सोडली साथ, ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?; कुणाचे किती संख्याबळ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर (Maharashtra Politics News) विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी दावा करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाचे विधापरिषदेतील संख्या कमी झाली आहे.

 

अंबादास दानवेंचे विरोधीपक्षपद जाणार?

आधी विप्लव बाजोरिया (Viplav Bajoria) आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 9 आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादीने (NCP) दावा केला तर त्यांचं पद जाऊ शकतं.  सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे आहे. त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.

 

विधान परिषदेतील संख्याबळ

भाजप -22
ठाकरे गट – 9
शिवसेना – 2
राष्ट्रवादी – 9
काँग्रेस – 8
अपक्ष – 7
रिक्त जागा – 21

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | manisha kayande left thackeray group lop ambadas danves position is in danger what is the seat sharing number in the legislative council

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा