Prashant Damle | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामलें बाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रशांत दामले (Prashant Damle) म्हटलं की नाटक हा शब्द आपोआप तोंडातून बाहेर येतो. एवढेच नाही तर मागील तीन दशके मराठी नाटक गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे. काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांनी 12500 चा विक्रमी (12500 Drama Show) टप्पा गाठला आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट असे नाटकाचे नाव होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सगळ्या जुना आठवणींना उजाळा दिला होता. एका कलाकारांनी इतके प्रयोग करणे याचे बहुदा एकमेव उदाहरण म्हणजे प्रशांत (Prashant Damle) दामले.

 

मुंबईत झालेल्या नाटकाच्या प्रयोगाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रेक्षकांकडून दामले यांना पद्म पुरस्कार (Padama Awards) द्यावा अशी शिफारस करण्यात आली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या नावाची शिफारस आधीच केली असल्याचे सांगितले. हे ऐकून प्रेक्षकांना अतिशय आनंद झाला.

मराठी चित्रपट सृष्टी तसेच मराठी रंगभूमीसाठी दामले यांना पद्म पुरस्कार मिळणे ही खूपच अभिमानाची बाब आहे.
12500 प्रयोग पार पडणं ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. या प्रवासात दामले यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
याविषयी सांगताना दामले म्हणाले, “एवढे प्रयोग कधी झाले कसे झाले हे मलाच काही कळाले नाही.
नाटक करायला घरच्यांचा विरोध होता कारण त्यावेळी नाटकांचा भार ओसरत चालला होता.
पण तुम्हाला सांगतो की ही चर्चा सतत होत असते नाटक आजवर काही थांबले नाही आणि थांबणार देखील नाही.
काळानुसार नाटक फक्त बदलत गेले आहे जो खरा नाटकवाला त्याला याची जाणीव आहे”.
अशी भावना प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Web Title :-  Prashant Damle | prashant damle 12500 drama show devendra fadnavis announced that he suggested his name for padama awards

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

Retired ACP Subhaschandra Dange Passes Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन