Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

पोलीसनामा ऑनलाइन : Prathamesh Parab | मध्यंतरीच अभिनेता प्रथमेश परब त्याच्या पोस्टमुळे चर्चेत होता. त्याच्या पोस्टने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. आज प्रथमेश त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रथमेशने ‘टाईमपास’ असो किंवा ‘टकाटक २’ या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एवढेच नाही तर प्रथमेशने मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टी देखील स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. प्रथमेशचा आज वाढदिवस असल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या सगळ्यात एका व्यक्तीच्या शुभेच्छा मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. ती व्यक्ती म्हणजे प्रथमेश ची कथित गर्लफ्रेंड. दिवाळीत प्रथमेशने एका मैत्रिणीबरोबरचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोवरून ती मुलगी प्रथमेशची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (Prathamesh Parab)

प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त तिची मैत्रीण क्षितिजा घोसाळकर हिने प्रथमेश साठी सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे. तिने इंस्टाग्राम वरती दोघांचा फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील दिले आहे. ज्यामध्ये शुभेच्छांबरोबरच तिच्या आणि प्रथमेश मध्ये असलेल्या क्लोज रिलेशन बद्दलही तिने सांगितले. तिच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा प्रथमेशच्या गर्लफ्रेंडच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Prathamesh Parab)

क्षितिजाने पोस्ट शेअर करत म्हंटले की, “Happiest 29th Birthday Mula. काय लिहु अरे तुझ्याबद्दल! म्हणजे फक्त Happy Birthday to you लिहून सुद्धा wish करता आलं असतं मला, पण तुझं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं आणि त्यातुन आज निमित्त वाढदिवसाचं! मग ही संधी मी कशी बरं सोडेन?

गेली अनेक वर्षं मी तुझा अभिनय , Dance बघतेय, ज्यात तू नेहमीच Best असतोस. पण अलीकडील काही वर्षे तुझ्यातील अभिनेत्या बरोबरच तुझ्यातील माणूसपण अनुभवतेय! फिल्म लहान असो किंवा मोठी, त्यात तुझे सीन्स कमी असोत किंवा जास्त, ते तू मनापासूनच करतोस. बरं नसतानाही शुटींग, promotion, Dance Rehearsal, हे सगळं तू तितक्याच dedication ने करतोस”.

पुढे तिने म्हंटले की, “बरं हे सगळं करत असताना कित्येकदा होणारं Trolling, अजिबात मनावर न घेता किंवा स्वतःची मानसिक स्थिती बिघडवू न देता, ती गोष्ट हसण्यावारी घेऊन तुझ्या कामातून,
तुझ्या performance मधून एकदम #चोख उत्तर देतोस.
आणि इतकं सगळं करून सुद्धा कोणत्याही गोष्टीचा तसूभरही गर्व न करता, सतत काहीतरी नवीन शिकण्याचा
( मग ते शून्यापासून का असेना) तुझा अट्टाहास वाखाणण्याजोगा असतो. #नेहमीच! सतत हसणं आणि इतरांना
हसवण, समजून घेणं, समजून सांगणं, कधीतरी अगदीच लहान तर कधीकधी खूप Mature,
समोरच्यातील एखादी लहानशी गोष्टही appreciate करून त्याला motivate करणं…..! सगळं किती easily करतोस रे तू! “.

शेवटी ती म्हणाली, “बऱ्याचदा Actor म्हटलं की त्याच्या on screen roles मुळे ,
तो रिअल लाईफमध्येही तसाच असावा असं पटकन judge केलं जातं. पण 70MM च्या पडद्यापलिकडील
प्रथमेश हा खूप जास्त pure आहे, Honest आहे आणि कायम असाच रहा! “.
सध्या सोशल मीडियावर क्षितिजाची पोस्ट जोरात व्हायरल होताना दिसत आहे.

Web Title :- Prathamesh Parab | prathamesh parab girlfriend written special post on her birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | सीमावादावरुन संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘त्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा…’

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे