Pravin Darekar | ‘माझ्याकडे बोट दाखवून संधी दिलीय, आता पुण्यासह इतर जिल्हा बँकेचे घोटाळे काढणार’ – प्रवीण दरेकर (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pravin Darekar | पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे माझ्याकडे आलेली आहेत. मोठे पुढारी सत्ताधारी असल्याने गरिबांचा आवाज दाबला जात होता. माझ्याकडे बोट दाखवून संधी दिलीय, यानिमित्ताने आता सर्वांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न मी करणार, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे.

मुंबई जिल्हा बँकेतील गैरव्यवहारावरून अध्यक्ष असणारे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर टीका केली जात आहे.
याबद्दल विचारलं असता मुंबई जिल्हा बॅंकेला अ वर्गाचा दर्जा मिळाला आहे. राज्यातील सर्वोत्तम दोन तीन बँकांमध्ये मुंबई बँकेचा (Mumbai Bank) समावेश आहे.
त्यामुळे सुडाने केल्या जाणाऱ्या कारवाईला भीक घालत नसल्याचं दरेकर म्हणाले.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.
पूर भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी दोन दिवसांनी मराठवाड्याचा दौरा करणार आहोत, अशी माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.

 

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही.
सरकारमधील मंत्री धनंजय मुंढे यांनी स्वतः पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केलीये.
तर मुख्यमंत्री म्हणतात. सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग होणार नसल्याचं दरेकर म्हणाले.

पुढे बोलताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, एका बाजूला शेतकरी संकटात असताना सरकारमधील लोकांकडून केले जाणारे जंगी स्वागताचे कार्यक्रम म्हणजे मीठ चोळण्याचे काम आहे. महाविकास आघाडी काही झालं की केंद्रावर ढकलायचं काम करते, ही त्यांची ठरलेली भूमिका आहे, केंद्राने सर्व संकटात राज्याला मदत केली आहे.
अजूनही आम्ही मदतीची मागणी करू. राज्य सरकारला (Maharashtra Government) आपल्या जबाबदारीपासून पळता येणार नाही.

 

Web Title : Pravin Darekar | ‘Give me a chance by pointing a finger, now Pune and other district bank scams will be exposed’ – Praveen Darekar (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

Health Tips | आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत ‘हे’ 5 प्रकारचे चहा; जाणून घ्या फायदे

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्य गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचं समन्स