7 हजार रूपये प्रति लिटर गाढवीणीचं दूध विकण्यासाठी तयार, त्याच्यानेच स्नान करत होती ‘ही’ महाराणी

गुजरात : वृत्तसंस्था – आत्तापर्यंत आपण फक्त गाय, म्हशी, मेंढ्या, बकरी, उंट यांचे दूध आणि त्यांच्या उत्पादनाबद्दल वाचले आहे पण आता गाढविणीचे दूधही त्यांच्यात सामील झाले आहे, गुजरातमध्ये याचं उत्पादन सुरू केलं आहे. आतापर्यंत गाढवांना ओझे वाहून नेण्याच्या कामासाठी ओळखले जात होते, परंतु हालारी जातीच्या गाढवाला दुभत्या जनावरांचा नवीन दर्जा मिळणार आहे.

आणंदच्या कृषी विद्यापीठाने चालवलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी गाढवाच्या दोन प्रजाती शोधल्या आहेत. एक हालारी आणि दुसरी कच्छी.

ही गाढवीण पांढर्‍या रंगाची गारी घोड्यासारखी आहे, परंतु हालारी घोड्यांपेक्षा आकाराने लहान आहे, परंतु इतर गाढवांपेक्षा मोठी आहे. हालारी जातीचे गाढव गुजरातच्या सौराष्ट्र भागात आढळते. आता गुजरात सरकार हालारी जातीच्या गाढवांना दुभत्या जनावरात विभागून उत्पन्नाचे साधन बनवण्याचा विचार करीत आहे.

आणंद कृषी विद्यापीठाचे पशुवैद्यकीय डॉक्टर डीएन रँक म्हणाले की, गुजरातच्या स्थानिक हालारी जातीच्या गाढविणीच्या दुधामध्ये औषधी गुणधर्म आहेत. इजिप्तची राणी क्लियोपेट्रा दुधात स्नान करायची कारण त्यात अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर अनेक घटक आहेत, ज्यामुळे हे दूध किमती बनते.

हे दुध सौंदर्य उत्पादने तयार करण्यासाठी वापरण्यात येणार असून त्यामुळे आता गुजरातमध्ये गाढविणीच्या दुधाचे उत्पादन सुरू होईल. बाजारात या दुधाची किंमत प्रति लीटर 7 हजार रुपये ठरवली गेली आहे, जे जगातील सर्वात महागडे दूध असल्याचे सिद्ध होईल.

डॉ. रंका यांनी सांगितले की आमच्या संस्थेने दोन प्रकारच्या गाढविणींची माहिती मिळवली आहे. सहजीवन ट्रस्ट, कच्छ यांच्यासमवेत आम्ही राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता, त्याला आता मान्यता देण्यात आली आहे.