#Video : ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा ‘प्रेग्नेंट’ अल्ट्रासाऊंड व्हिडिओ प्रचंड व्हायरल…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. गरोदर असलेल्या अभिनेत्रीचा अल्ट्रासाऊंड व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओ मध्ये ज्या अभिनेत्री बद्दल बोलले जात आहे ती दुसरी कोणी नसून हॉट अभिनेत्री पैकी एक ऐमी जैक्सन आहे. हा व्हिडीओ समोर आल्यापासून ऐमी चर्चेत आली आहे. गरोदर होऊन तिला २३ आठवडे झाले आहेत. गर्भवती एमीचा अल्ट्रा साउंड व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये तिच्या गर्भातील बाळ कॉम्प्युटर स्क्रीनवर स्पष्ट दिसत येत आहे.

 

बाळाला बघतांना ऐमीचा चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. ऐमी आणि तिचा पती जॉर्ज दोघेही त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी खूप खुश आहेत. सोशल मीडियावर तिचे चाहते तिला तिच्या येणाऱ्या बाळाची काळजी व स्वतःची दक्षता घेण्यासाठी सल्ले देत आहेत. त्याशिवाय काहींनी त्यावर नकारात्मक कंमेंन्ट देखील केली आहे. नक्कीच तो मुलगा असणार. त्यावर एका यूजरने लिहिले की, देव त्यांची रक्षा करो, बाळाला कोणाची नजर ना लागो. हा व्हिडीओ ऐमीने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंट वर स्टोरी वर टाकला आहे. ऐमी आणि जॉर्जचा हा पहिला मुलगा असावा. ते दोघे एकमेकांना २०१५ पासून डेट करता आहेत.