आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ; AICCकडून स्क्रिनिंग कमिटीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आज स्क्रिनिंग कमिटीची घोषणा केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांची निवड केली असून ही कमिटी एकूण ६ सदस्यांची असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

याबाबतचे प्रसिध्दीपत्रक काँग्रेसने प्रसारमाध्यमांना दिले असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने ते पारित केले गेले आहे. या कमिटीतील सदस्य पुढीलप्रमाणे असतील :

१. ज्योतिरादित्य सिंधिया – अध्यक्ष

२. श्री. हरीश चौधरी – सदस्य

३. श्री. मणिकाम टागोर – सदस्य

४. श्री. मल्लिकार्जुन खर्गे – अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी, जनरल सेक्रेटरी इन चार्ज

५. श्री. बाळासाहेब थोरात – प्रदेश काँग्रेस कमिटी, अध्यक्ष

६. श्री. के. सी. पडवी – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते

राज्यात सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी करत असून निवडणुकांची रणधुमाळी आत्तापासूनच सुरु आहे. या समितीच्या माध्यमातून काँग्रेसनेही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर असून तयारी करणार असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आपल्या पक्षास नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेस आणखी काय पावले उचलते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like