Prithviraj Chavan | तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडायचे, नेत्यांना धमकवायचं, हेच भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

लोणावळा : Prithviraj Chavan | काँग्रेसचे राज्यस्तरीय चिंतन शिबीर आजपासून लोणावळ्यात सुरू झाले आहे. हे शिबीर दोन दिवस चालणार आहे. या शिबिराला राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. आज काँग्रेसच्या शिबीरात ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाकडून तपास यंत्रणांचा सुरू असलेल्या गैरवापरावर जोरदार टीकास्त्र सोडले. (Prithviraj Chavan)

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपने ईडी, सीबीआय, आयकर विभाग या तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रात आणि त्याआधी इतर राज्यांत लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडले. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खोटी कारवाई केली जात आहे. त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. दहशत निर्माण केली जात आहे.

ते पुढे म्हणाले, अशा प्रकारे केंद्रीय आणि राज्यातील चौकशी आणि तपास संस्थांचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष फोडायचे, सरकार बदलायचे, आपले सरकार आणायचे ज्याला ऑपरेशन लोटस असे नाव त्यांनी दिले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर गंभीर आरोप करताना म्हटले की, या सर्व गैर कृत्यांमध्ये संविधानिक पदावर
असलेले राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या हस्ते संविधानाला आणि राज्यघटनेला काळिमा फासत ही
सर्व कारवाई चालू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांनी कामांच्या वर्क ऑर्डर देण्याची मुदत सात मार्चपर्यंत वाढविली

Pune PMC-Abhay Yojana 2024 | ओपन प्लॉट्सच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा अद्याप निर्णय नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Sena Kesari 2024 In Pune | पुणे: हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम (Video)