Pune News : पृथ्वीराज साठे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेने नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी करण्यात आली आहे, हि निवड काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी.वेणूगोपाल यांनी जाहीर केली आहे.
पत्रकार परिषदेतून साठे यांनी याबाबत सविस्तर माहीती दिली.

पृथ्वीराज साठे हे पिंपरी चिचंवड मधील रहिवासी असून ते पिंपरी चिचंवड महानगरपालिकेचे माजी महापौर स्व. प्रभाकर साठे यांचे चिरंजीव आहेत, ते उच्चशिक्षित आहेत त्यांचे लंडन येथील लीडस् युनीवर्सिटी येथून एम ए आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात शिक्षण झाले आहे.

साठे यांना संघटनात्मक राजकारणाचा चांगला अनुभव असून ते गेल्या २५ वर्षां पासून काँग्रेस संघटनेमध्ये सक्रीय असून विविध पदांवर विविध राज्यांतून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. राहूल गांधी यांच्या संघातील ते विश्वासू सहकारी आहेत व देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध स्तरावर त्यांनी काम केलेले आहेत.

पत्रकार परिषदेस पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी विरोधी पक्ष नेते कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, विश्वास गजरमल, अख्तारभाई चौधरी, रामचंद्र माने, बाळासाहेब साठे, युवक काँग्रेस चे शहाराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डाॅ. वसीम ईनामदार, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, युवक काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, अनिल सोनकांबळे, पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे, अशोक काळभोर, विजय ओव्हाळ, संजय साठे, शंकर तांदळे, नितीन काळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.