‘या’ मालिकेत होणार प्रिया मराठेची एन्ट्री ! पहायला मिळणार मॉडर्न अंदाज

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लहान पडद्यावरील मालिका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण चाहत्यांना चांगली आवडताना दिसत आहे. नचिकेत, सई आणि आप्पा केतकर या मालिकेतील 3 असे कॅरेक्टर आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनात जागा केली आहे. पाहता पाहता या मालिकेनं 350 भागांचा टप्पा गाठला आहे.

ADV

आता या मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे ती म्हणजे नचिकेतची आई इरा देशपांडे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एका नवीन ॲक्ट्रेसची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ती म्हणजे प्रिया मराठे (Priya Marathe) हिची. पुण्यात लहानाची मोठी झालेली इरा लग्न करून ऑस्ट्रेलियाला गेली आणि 25 वर्षे ती तिकडेच राहते.

ती विचारानं खूपच मॉडर्न आहे. परंतु भारतात असे काही लोक आहेत जे अजूनही अपडेट झालेले नाहीत आणि जुन्या विचारांचे आहेत. आता नचिकेत एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडला हे ऐकून आता तिची काय प्रतिक्रिया असेल हे आगामी भागातच कळेल.

प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर या सुखांनो या या मालिकेतून तिनं लहान पडद्यावर एन्ट्री केली. यानंतर चार दिवस सासूचे मालिकेत तिनं काम केलं. तू तिथं मी या मालिकेत तिनं साकारलेली भूमिकाही खूप गाजली. याशिवाय कसम से या मालिकेतून तिनं हिंदी मालिकेत एन्ट्री मारली. मात्र पवित्र रिश्ता या मालिकेतील भूमिकेमुळं ती प्रत्येकाची लाडकी बनली. बडे अच्छे लगते है, कॉमेडी सर्कस, साथ निभाना साथियाँ अशा अनेक मालिकेत काम केलं आहे.