…म्हणून प्रिया प्रकाश वारियरच्या टीचरला वाटते प्रियाने अ‍ॅक्टींग करू नये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियामुळे रातोरात फेमस झालेली विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियर नेहमीच चर्चेत असते. प्रिया लवकरच श्रीदेवी बंगलो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. प्रिया आपल्या बॉलिवूड डेब्यूबाबत खूपच एक्साइटेड आहे. प्रियाला वाटते की, अ‍ॅक्टींगमध्ये करिअर करण्यासाठी हा सिनेमा म्हणजे चांगली सुरुवात ठरू शकतो.

प्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या टीचरला वाटते की, तिने अ‍ॅक्टींगपेक्षा अभ्यासावर जास्त लक्ष द्यायला हवं. प्रिया सांगते की, तिच्या टीचरला वाटतं की, प्रिया अ‍ॅक्टींगपेक्षा अभ्यासात चांगलं करू शकते. यावर भाष्य करताना प्रिया म्हणते की, “ते त्यांच्याजागी बरोबर आहेत परंतु मला अ‍ॅक्टींगच करायची आहे.

आपल्या आगमी सिनेमाबाबत बोलताना प्रिया म्हणते की, “श्रीदेवी बंगलो सिनेमातून मी बॉलिवूड डेब्यू करत आहे. या सिनेमाला घेऊन अनेक वाद झाले आहेत. परंतु सर्वात शेवटी हा सिनेमा एक चांगला सिनेमा म्हणून पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या ट्रेलरमुळे मला चांगला फीडबॅक मिळत आहे.”

View this post on Instagram

🐼

A post shared by Priya Prakash Varrier (@priya.p.varrier) on

श्रीदेवी बंगलो हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमाला प्रशांत माम्बुली दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमात प्रियाव्यतिरीक्त प्रयांशु चटर्जी, असीम अली आणि मुकेश ऋषी लीड रोल प्ले करत आहेत.

प्रियाचा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधी प्रियाने आपल्या नव्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे. प्रियाचा आगामी सिनेमा लव हॅकर आहे. या सिनेमाची स्टोरी सायबर क्राईमवर आधारीत आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like