Priyadarshini Indalkar | शाहिद कपूरच्या ‘फर्जी’मध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ‘ही’ अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : Priyadarshini Indalkar | गेल्या अनेक दिवसांपासून शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांच्या ‘फर्जी’ या वेब सिरीजची लोकांना उत्सुकता होती. 10 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आणि चाहत्यांनी तिला चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. या वेब सिरीज मध्ये शाहिद कपूर एक चोर आणि तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. या वेब सिरीज मधून शाहीर कपूरने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. याच वेब सिरीज मध्ये आता आणखीन एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. (Priyadarshini Indalkar)

फर्जी ही वेब सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी तिला चांगली पसंती दिली आहे. ही वेब सिरीज एक क्राईम किलर वेब सिरीज आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन कृष्णा डीके आणि राज निदिमोरू यांनी केले आहे. या वेब सिरीज मध्ये शाहिद कपूर आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर राशी खन्ना, रेजिना कॅसांड्रा, के के मेनन, कुब्ब्रा सैत हे कलाकार ही सहाय्यक भूमिकेत झळकत आहेत. तर या वेब सिरीज मध्ये ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकर देखील दिसत आहे. (Priyadarshini Indalkar)

या वेब सिरीज मध्ये प्रियदर्शनीने शाहिद कपूरच्या कंपनीमध्ये रिसेप्शनिस्टची भूमिका साकारली आहे.
प्रियदर्शिनी या वेब सीरिजच्या दोन भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
जेव्हा शाहिद कपूर कंपनीच्या रिसेप्शनिस्टची मुलाखत घेत असतो त्यावेळी प्रियदर्शनी देखील मुलाखतीसाठी येते आणि नंतर तिची निवड करण्यात येते.
प्रियदर्शनीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलराणी’ या चित्रपटात दिसणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटात ती फुलराणी ही भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटात प्रियदर्शनी प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title :- Priyadarshini Indalkar | priyadarshini indalkar play receptionist role in shahid kapoor farzi web series

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | गरोदर असल्याच्या चर्चांवर राखी सावंतने सोडले मौन ; आदिल खानवर केले गंभीर आरोप

Onkar Bhojane – Vanita Kharat | ओंकार आणि वनिताच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल; वनिताच्या नवऱ्याने या भेटीनंतर दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन