आता तनुश्री- नाना पाटेकरच्या वादात उतरले ‘हे’ कलाकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

चित्रपट श्रुष्टीतील नटसम्राट नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता ने गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे, हा वाद इतका वाढला आहे की, या रंगलेल्या वादावर प्रतिक्रिया देण्यास कोणताही कलाकार तयार होत नाहीये. त्यातच अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेवर ही त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. यात या वादात उडी घेतलीये बॉलिवुडच्या काही दिग्गजांनी…

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान हा प्रकार घडल्याचेही तनुश्री दत्ता हीने सांगितले. इतकेच नव्हे तर नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले होते हे अनेकांनी पाहिले परंतु कोणीही माझ्यामागे उभे राहिले नाही, सगळ्यांनी यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही तनुश्री सांगितले. पण, आता परिस्थिती बदली आहे आता सोशल मीडियावर #IBelieveYouTanushreeDutta या हॅशटॅग अतर्गंत अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तनुश्रीला पाठिंबा दिला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a4e5ae5-c329-11e8-bbfc-e1eb6e056e5d’]

‘हॉर्न ओके प्लीज चित्रपटा’च्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकरांनी जेव्हा तनुश्रीसोबत गैरवर्तन केलं तेव्हा मी तिथंच होते असा खुलासा पत्रकार जॅनिस सकीरा हिनं केला आहे. तिनं तसं ट्वीटचं केलं आहे. अभिनेता फरहान अख्तरनं जॅनिस सकीराचं ते ट्वीट रीट्वीट करतं तनुश्रीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर, प्रियांका चोप्रानं देखील फरहानच्या बोलण्याला सहमती दर्शवत तनुश्रीचे समर्थन केले आहे.

या दोघांव्यतिरिक्त, अभिनेत्री ट्विंकल खन्नानं ‘तनुश्रीवर आरोप करण्यापूर्वी ‘हे’ ट्वीट वाचा. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराला सामोर जावं लागत आहे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.’ असं ट्वीट तिनं केलं आहे. तर, नेहमी रोखठोक बोलणारी अभिनेत्री स्वरा भास्करनं ही तनुश्रीला पाठिंबा दर्शविला आहे.

संबंधित बातम्या

नाना पाटेकरांकडून गैरवर्तन, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप

मला जसं जगायचंय तसं जगणार : नाना पाटेकर

नाना – दत्ता वादावर बोलण्यास दिग्गज कलावंतांची टाळाटाळ

तनुश्री – नाना वादात बीग बी अडकले नेटीझनसच्या भोवऱ्यात

[amazon_link asins=’B075K83QJK,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93eae3ef-c329-11e8-bfa4-9ff36d65b708′]