Priyanka Chahar Choudhary | एमसी स्टॅनचे नाव ऐकताच प्रियांकाने दिली ‘हि’ रिअ‍ॅक्शन; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Priyanka Chahar Choudhary | बिग बॉस चा 16 वा सीजन अखेर संपला. मात्र अजूनही बिग बॉसची चर्चा जोरात सुरू आहे. बिग बॉस 16 चा विजेता पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन बनला आहे. एमसी स्टॅनच्या विजयानंतर सर्वच आश्चर्य झाले. कारण यंदाचा विजेता प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) आणि शिव ठाकरे यापैकी एक असतील असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. मात्र एमसी स्टॅन विजेता झाल्याने अनेकांनी यावर टीका देखील केली होती. एवढेच नाही तर प्रियंकाचा मित्र आणि बिग बॉस स्पर्धक अंकित गुप्तानेही एका मुलाखतीत म्हटले होते की, “आता तर काहीही न करता ही बिग बॉस हा शो जिंकता येतो”. आता त्याच्या वक्तव्यानंतर प्रियंका चहर चौधरीची एक प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

प्रियंकाला ‘उडारिया’ या कलर्स टीव्हीच्या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. प्रियंकाने कलर्स टीव्ही बरोबर ही मालिका केल्यामुळे तिला बिग बॉस 16 देखील जिंकता येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र नेटकऱ्यांच्या या अंदाजावर पाणी फेरत यंदाचा विजेतेपद एमसी स्टॅनने पटकावले. तर प्रियंका टॉप 2 मध्ये स्वतःची जागा देखील बनवू शकली नव्हती. बिग बॉस फिनाले नंतर प्रियांका मुंबईमध्ये दिसली. यावेळी पापाराझींनी तिला अनेक प्रश्न विचारले होते. यावेळी प्रियंकांनी एमसी स्टॅन बद्दल केलेल्या वक्त्यव्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पापाराझींशी बोलताना प्रियांका म्हणाली “आपले खूप खूप आभार आजवर तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले ते तशाच पद्धतीने राहू द्या आणि आणखीन प्रेम माझ्यावर करा”. यावर पापाराझींनी तिला एमसी स्टॅन बद्दल विचारले असता ती म्हणाली “तो अमेझिंग आहे आणि खरं व्यक्तिमत्व आहे” एवढं बोलून प्रियांका तिथून निघून गेली. मात्र सध्या प्रियांकाच्या या व्हिडिओवरून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर प्रियांका चौधरीचा (Priyanka Chahar Choudhary)
हा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने त्यावर कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.
तर एका नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की “एमसी स्टॅनला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तो सगळ्यांनाच आवडत आहे,
याआधी त्याला कोणीही विचारत नव्हते”.
तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटले की “एमसी स्टॅनचे नाव ऐकताच तिचा मूडच गेला, बिचारी जळती त्याच्यावर मात्र हे ती बोलू शकत नाही त्यामुळे तिने त्याच्याबद्दल चांगले बोलले आहे”. अशा पद्धतीचे एक ना अनेक कमेंट प्रियांकाच्या या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

 

Web Title :- Priyanka Chahar Choudhary | bigg boss 16 contestant priyanka chahar choudhary react on mc stan got troll

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nashik Crime News | मासेमारी करताना दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Aadhar- Pan Link | पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला; पुढील तारीख मात्र अद्याप निश्चित नाही