‘या’ कारणामुळे प्रियांका झाली भावनिक, फोटो शेअर करुन व्यक्त केले ‘दुःख’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. कधी ट्रोल होऊन तर कधी सुंदर हॉट फोटो शेअर करुन सोशल मिडियावर तिच्या चर्च्या चालतच राहतात. नुकताच तिने तिच्या अकाउंटवर तिचे वडिल अशोक चोप्रा यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने तिच्या काही आठवणी सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. या आठवणी शेअर करुन प्रियांकाने अतिशय भावनिक होऊन पोस्ट लिहली आहे.

प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका झाडावर बसली आहे आणि तिचे वडिल तिच्या शेजारी थांबलेले दिसत आहे.  प्रियंकाने हा फोटो शेअर करुन एक भावनिक कॅप्शन लिहले आहे.

प्रियंकाने लिहले की, “6 years. Seems Like just yesterday we lost you..I miss you Dad. Inexplicably.”

पोस्टवरुन समजते की, प्रियंकाची वडिलांसोबत जवळीक खूप होती. तिच्या वडिलांचे निधन २०१३ मध्ये झाले. याचा प्रियंकाला खूप मोठा धक्का बसला होता. तिने आपल्या पितासोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. एवढेच नव्हे तर तिने आपल्या हातावर ‘डैडी लिटिल गर्ल’  असा टॅटू देखील काढला आहे.

प्रियांकाच्या खाजगी जीवनाबद्दल बोलायचे म्हणले तर, सोनाली बोस यांचा चित्रपट ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटात प्रियंका दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता फरहान खान आणि जायरा वसीम ही दिसणार आहे. या चित्रपटाची स्टोरी १३ वर्षाची मोटिवेशनल स्पीकर आयशा यांच्यावर आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.