दारूच्या नशेत अखेर प्रियांका चोप्राने विमानात…; ‘हा’ प्रसंग खूप चर्चेत

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड देसी गर्ल प्रिय़ांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये देखील चांगलच नाव कमावतेय. ७४ व्या बाफ्टा अवॉर्डसोहळ्यात तिने पती निक जोसनसोबत सहभाग घेतला होता. यावेळी तिच्या बोल्ड लूकने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रियांकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आता जगभरात प्रियांकाचे प्रचंड चाहते आहेत. तिच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या आहेत. प्रियांका सध्या यशाच्या अशा शिखरावर आहे कि जिथे तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतेय.

प्रियांका चोप्रा पती निक जोनससोबत नुकतीच ७४ व्या बाफ्टा अवॉर्ड सोहळ्यात सामील झाली होती. यावेळी बिना बटनाच्या गुलाबी जॅकेटमुळे प्रियांका चांगलीच चर्चेत आली होती. यासोबतच सध्या प्रियांका एका जुन्या प्रसंगामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दारूच्या नशेत प्रियांकाने विमानात केलेलं एक कृत्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

काही वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे. त्यावेळी प्रियांका ‘क्वान्टिको’ या हॉलिवूड वेब सीरिजमुळे प्रकाश झोतात आली होती. पिंकविलाच्या वृत्तानुसार, एका फ्लाईट अटेंडेन्टने हा प्रसंग शेअर केला आहे. या फ्लाईट अटेंडेन्टने या मजेदार अनुभवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र काही वेळाने तो तिने डिलीट करून टाकला. या अटेंडेन्टच्याने सांगितलं, की प्रियांकाने विमानात तिच्या एका फेव्हरेट कॉकटेलची मागणी केली होती. त्यानंतर तिने हॉट सॉसेजची मागणी केली. प्रियांकाने या कॉकटेलचे ३ ड्रिंक संपवले. त्यानंतर मात्र ती नशेत धुंद झाली. काहीवेळ तिने स्वत:ला सावरलं. नंतर मात्र ती चुपचाप झोपून गेली. फ्लाईट अटेंडेन्ट तिने शेअर केलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ डिलीट केल्याने तो इंटरनेटवर सध्या उपलब्ध नाही.

BAFTA मधील प्रियांकाचे काही अजून फोटोज: