‘देसी गर्ल’ प्रियंकानं पुन्हा एकदा तोडल्या ‘बोल्डनेस’च्या मर्यादा, ‘हॉटनेस’नं वाढवलं इंटरनेटचं ‘टेम्टेशन’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा आपल्या लेटेस्ट फोटोशुटमुळं चर्चेत आली आहे. अलीकडेच तिनं काही फेमस मॅगेझिनसाठी फोटोशुट केलं आहे. यातील प्रियंकाचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या हॉटनेसनं तिनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.

https://www.instagram.com/p/B9G4-9rpkg8/

प्रियंकानं आपल्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियंका वेगवेगळ्या आउटफिटमध्ये दिसत आहे. प्रियंकानं दिलेली पोजही खूप हॉट आहे. कातिलाना अंदाज आणि घायाळ करणारे फोटो पाहून चाहतेही पागल झाले आहे. प्रियंकानं काही मासिकांसाठी फोटोशुट केलं आहे. ज्याची सध्या सोशलवरही जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9I0HdXhmWK/

एका फोटोत प्रियंका ब्लॅक कलरच्या नेट आऊटफिटमध्ये दिसत आहे. यात तिनं मिनिमल मेकअप केला आहे. या बोल्ड अवतारात प्रियंका खूपच हॉट दिसत आहे. आणखी एका फोटोत तिनं ब्लॅक ट्रान्सपरंट ट्युब टॉपमध्ये दिसत आहे. प्रियंकाचे हे फोटो सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/B9I0fOEhkxo/