‘ओशो’ची ‘सन्यासिन’ बनणार प्रियंका चोप्रा जोनास, जाणून घ्या ‘का’ घेतला निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी प्रियंका चोपडा नेहमीच आपल्या लुक आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. प्रियंकाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. प्रियंका आता आचार्य रजनीश ओशो यांची सन्यासिन बनणार आहे.

तुम्हाला जर वाचून धक्का बसला असेल तर जरा थांबा. कारण प्रियंका रिअल लाईफमध्ये असं अजिबात करणार नाहीये. परंतु तिच्या रिअल लाईफमध्ये ती आता एका आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. मां आनंद शीला या नावानं प्रसिद्ध शीला बिएर्निस्टिल यांच्या बायोपिकमध्ये ती लिड करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीर्घकाळापासून चर्चेत असणारा हा सिनेमा लवकरच तयार केला जाणार आहे.

https://www.instagram.com/p/B8X6r8Op0yp/

असंही म्हटलं जात आहे की, अनेक निर्मात्यांनी त्यांना त्यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवण्यासाठी संपर्क केला आहे. काही दिवसांपूर्वी मां आनंद शीला यांनी प्रियंका चोपडाला बेकायदेशीरपणे आपलं जीवन पडद्यावर आणण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. आता हॉलिवूडच्या एका वेबसाईटच्या ताज्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रियंकाला या सिनेमासाठी मां आनंद शीला यांची भूमिका साकारण्यासाठी कास्ट करण्यात आलं आहे.

या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, प्रियंका या सिनेमाला आपल्या आयुषयातील सर्वात महत्त्वाची भूमिका मानते. त्यामुळेच तिनं या सिनेमात काम करणं स्विकार केलं. काही दिवसांपूर्वी आलिया भटला कास्ट केल्याचं बोललं जात होतं.

कोण आहेत मां शीला आनंद ?

अप्रत्यक्षपणे मां शीला आनंद रजनीश आंदोलनातील एक भारतीय वंशाच्या अमेरिकन-स्विस माजी प्रवक्त्या आहेत. त्या 1984 च्या रजनीश बियोटेरोर अटॅकमध्ये हत्या आणि हल्ल्याच्या प्रयत्नात दोषी ठरवण्यात आल्यानंतर वादात सापडल्या होत्या. हा सिनेमा हॉलिवूडचे डायरेक्टर बॅरी लेविंसन डायरेक्ट करत आहेत. निक यारबोरो यांनी हा सिनेमा लिहिला आहे.