‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केले ‘बोल्ड’ अन् ‘ग्लॅमरस’ फोटो ! ‘हृतिक रोशन-राजकुमार राव’ म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका आपल्या काही फोटोंमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तीन ब्लू डेनिम जीन्स आणि व्हाईट टी शर्टमध्ये दिसत आहे. सोबत तिनं ब्लूईश ग्रे अँकल बूटही पेअर केले आहेत. सिंपल जीन्स आणि टीशर्टमध्येही ती खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

प्रियंकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील सेलेब्सनंही यावर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. अभिनेता हृतिक रोशन यावर कमेंट करत म्हणाला की, क्या बात है. या सोबत राजकुमार राव कमेंट करत म्हणाला आहे की, पीसी. सोबत त्यानं हार्ट आणि किसिंग इमोजीही वापरली आहे. अनुषा दांडेकरनंही कमेंट यावर कमेंट केली आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती ॲमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.