Project K Glimpse | अमेरिकेत प्रोजेक्ट के चित्रपटाचा प्रीमियर शो; प्रभासच्या चाहत्यांनी केली गर्दी

पोलीसनामा ऑनलाइन – Project K Glimpse | सध्या मनोरंजन विश्वामध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाची अमेरिकेमध्येही चर्चा आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर न्यूयॉर्क शहरामध्ये रिलीज (Project K Glimpse) करण्यात आले. यावेळी तिथेही अभिनेता प्रभासच्या (Prabhas) चाहता वर्गाने मोठी गर्दी केली होती. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर वर (Times Square In New York) ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे पोस्टर झळकले.

https://www.instagram.com/p/Cu5hXKwy2Mi/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cu5kftIy1-L/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cu524KKRm47/?igshid=MzRlODBiNWFlZA==

‘प्रोजेक्ट के’ चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास, अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan) या कलाकांराच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या नवीन (Project K Glimpse) पोस्टरमध्ये या सर्व कलाकारांचा समावेश आहे. हे नवीन पोस्टर आज (दि.20) न्यूयॉर्क शहरामधील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर वरील आयकॉनिक बिलबोर्डवर झळकले. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.

https://www.instagram.com/p/Cu6Sv41xwhE/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cu6YzC1RlsQ/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cu6deQkxzfD/?igshid=MzRlODBiNWFlZA==

तसेच अमेरिकेमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा खास प्रिमियर (Project K Glimpse In USA) पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकारांनी उपस्थिती लावली. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन (Director Nag Ashwin) यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीज् यांनी केली आहे. अमेरिकेतील रस्त्यावर ‘प्रोजेक्ट के’ चे सैन्य लोकांचे लक्ष वेधत होते. लहान मुलांनी देखील प्रोजेक्ट के च्या टीम सोबत खूप एन्जॉय केलेले दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Cu69KhbseY1/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cu00zjvRThO/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://twitter.com/PrabhasRaju/status/1681884401444216832?t=SKuXGjnPKqud1Q3_IN8VfQ&s=19

चित्रपटातील अभिनेता प्रभास (Actor Prabhas ProjectK Look) व अभिनेत्री दीपिका पादुकोन
(Deepika Padukone ProjectK Look) यांचा लूक आऊट करण्यात आला होता.
हे लूक देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लोकांच्या प्रतिक्रियेनंतर प्रभासच्या लूकमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला असून नवीन पोस्टर
(Prabhas Project K New Look) आऊट करण्यात आले. उद्या या चित्रपटाचा स्पेशल प्रीमियर शो भारतामध्ये
पार (ProjectK Glimpse) पडणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा बिग बजेट चित्रपट असून साधारणपणे 600 करोड रुपयांमध्ये चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे. ही भारतातील सर्वात महागडी फिल्म असून प्रेक्षकांच्या देखील चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक