अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी २५ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.  दरम्यान बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने सही शिक्क्यानिशी आरोपपत्राची प्रत देण्याची मागणी केल्यानंतर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश  एस. एस. सापटणेकर यांनी त्याला फटकारले होते. मंगळवारी याप्रकऱणावर 25 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम उपस्थित होते.
[amazon_link asins=’B01NBNUOQD,B01DPUXK6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’523c9bba-b5e2-11e8-947a-31f953557849′]
6 नोव्हेंबर 2017 रोजी सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत कामटेसह त्याच्या साथीदारांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. जबरी चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांना अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला अमानुष मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.
[amazon_link asins=’B018W8DTH2,B01KJFHEWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24298fd5-b5e2-11e8-a6a9-c185a5c952c6′]
दाखल आरोपपत्राच्या नक्कल प्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्का देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी कामटेने आरोपपत्राची न्यायालयाकडे दाखल असलेल्या कागदपत्रांची प्रत मला सही शिक्क्यानिशी हवी आहे. त्या आरोपपत्रात बदल केला जाईल अशी शंका त्याने थेट न्यायाधीशांकडे व्यक्त केली. त्यानंतर न्या. सापटणेकर यांनी त्याला फटकारले होते. या प्रकऱणावर मंगळवारी सुनावणी होणार होती. पण आता ती 25 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.