छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ आंदोलन

ADV

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झाली असून त्याचे सुशोभिकरण करण्यात यावे. या मागणीसाठी आज पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि प्रशासना विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते संजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना , चंद्रकांत मोकाटे म्हणाले की,डेक्कन जिमखाना जवळील चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.त्याची दुरवस्था झाली असून त्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे. याची खंत वाटत आहे.या स्मराकाचे सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावे.अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल.असा इशारा त्यांनी सताधारी भाजप आणि प्रशासनाला त्यांनी यावेळी दिला.