Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुण्यात पोर्शे गाडीने धडक दिल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील अल्पवयीन मुलाने मद्यपान केले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या अपघाताच्या कारवाई दरम्यान पोलिसांनी दिरंगाई करीत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही करण्यात आला.(Protest Of Sharad Pawar NCP In Pune)

आज आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी या प्रकरणाला घेऊन पोलीस आयुक्तालयात (Pune CP Office) आंदोलन केले. तसेच हे प्रकरण योग्य पद्धतीने न हाताळल्याने पुणे शहराची देशात बदनामी झाली म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

गृहमंत्री जागे व्हा , तिघाडी सरकार जागे व्हा… म्हणत यावेळी घोषणा देण्यात आल्या.

कधीकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आता ड्रग्स चे शहर तसेच हिंसेचे शहर अशी कुप्रसिद्धी होत असल्याचा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. पुण्यातील गोळीबाराच्या घटना, कोयता गॅंग ,अमली पदार्थ , अनधिकृत पब वर पोलिसांचा वरदहस्त असे मुद्दे मांडत निषेध केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी