PSI Suspended In Pune Pimpri | पुणे (पिंपरी) : पाच लाख खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – PSI Suspended In Pune Pimpri | गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये (Ganja Case) अडकवण्याची धमकी देऊन देहुरोड पोलिसांनी (Dehu Raod Police) कॉलेज तरुणाकडे 20 लाखांची मागणी करुन जबरदस्तीने पाच लाख रुपये खंडणी (Extortion Case) उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. (Pimpri Chinchwad Police)

सोहम धोत्रे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे (PSI Soham Dhotre) . धोत्रे हे देहुरोड पोलीस ठाण्यात तपास पथकात कार्यरत होते. किवळे येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपये खंडणी उकळली. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात आयपीसी आयपीसी 363, 384, 385, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (PSI Suspended In Pune Pimpri)

गुन्ह्यात पोलीस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला. हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ या दोघांची दोहुरोड पोलीस ठाण्यात नियुक्त केली होती. पोलिसांच्या तपास पथकात ते कार्यरत होते. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांचा वचक न राहिल्याने गायकवाड व शेजाळ यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य केले.

देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.
देहूरोडच्या तपास पथकाकडून अवैध धंद्यांना आळा बसवणे गरजेचे होते. मात्र, गुन्हे शाखेने अवैध धंद्यावर कारवाई केली.
या कारणामुळे पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ‘सगेसोयरे’चा मुद्दा निकाली काढायचा नव्हता, तर अधिवेशनाची गरजच काय? मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जरांगे संतापले

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज महत्वाचा निर्णय, विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार

ACB Trap Case | सहायक फौजदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Asim Sarode On Eknath Shinde | एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे, उद्धव ठाकरेंना पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळेल : असिम सरोदे

पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक