PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कराची सवलत मिळविण्यासाठी पीटी ३ हा अर्ज भरून घेण्यासाठी आता महापालिकाच शिबीर आयोजित करणार आहे. हे शिबीर प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आयोजित केले जाईल.(PT-3 form – Pune PMC Property Tax)

महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातर्ंगत एक पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. या सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या मिळकतीबाबत राबविला. महापालिकेची यंत्रणा वापरून सर्वे केला.

यामध्ये ३७०९ मिळकतीमध्ये मालक स्वतः राहत असताना त्यांची कर सवलत काढली गेल्याचे आढळून आले. २२९४ मिळकतीमध्ये भाडेकरू आढळून आले आहेत.

मिळकत करात चाळीस टक्के सवलत मिळविण्यासाठी पीटी ३ फॉर्म भरणे आवश्यक आहे. या अर्जाविषयी मिळकतदारांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडील नोंदीनुसार सुमारे पावणे दोन लाख मिळकतदारांकडून पीटी ३ फॉर्म दाखल होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात चाळीस हजार मिळकतदारंानीच हा अर्ज दाखल केला आहे. या अर्जाविषयी मिळकतदारांना पुर्ण माहीती नाही, यामुळे अनेक तक्रारी येत आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांना विचारले असता, ते म्हणाले,
महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातर्ंगत पायलट प्रोजेक्ट राबविला आहे.
यातून काही चांगल्या गोष्टी पुढे येत आहेत. यापार्श्वभुमीवर मिळकतदारांना महापालिकेत येण्याचा त्रास होऊ नये,
याकरीता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर हा फॉर्म भरून घेण्यासाठी शिबीरच आयोजित करण्यात येईल.
याकरीता मिळकत कर विभागाच्या कर्मचार्‍यांना मदत म्हणून तेथील क्षेत्रीय कार्यालयातील इतर विभागाच्या कर्मचार्‍यांवर
या कामाची जबाबदारी दिली जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी