Pub Owners In Pune | पुण्यात 50 पब आणि हॉटेलवर कारवाई केल्यानंतर मालक, कर्मचाऱ्यांचे आंदोलन; पब बंद झाले तर काय करणार? (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pub Owners In Pune | पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणातील (Porsche Car Accident Pune) बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलाने (Builder Vishal Agarwal) मित्रांसोबत पबमध्ये जाऊन दारू ढोसली होती. विशेष म्हणजे येथील कर्मचारी आणि मॅनेजर हे सर्रास अल्पवयीन मुलांना दारू देत असल्याचे यानंतर उघड झाले होते. नंतर त्याने भरधाव कार चालवून तरूण-तरूणीचा जीव घेतला होता. यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. (Kalyani Nagar Accident)

रात्रभर चालणाऱ्या या बेकायदेशीर पब आणि हॉटेलांवर पुणे महापालिका आणि प्रशासनाने कारवाई करून ५० हॉटेल्स बंद केली. यानंतर आता पबचे मालक आणि कर्मचारी पोटाच्या काळजीने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.(Pub Owners In Pune)

या कारवाईनंतर बार मालक आणि कामगारांनी पब बंद करण्याच्या प्रशासनाच्या कारवाईलाविरोध केला आहे.
त्यांनी पुण्यातील राजा बहादूर मिल येथे रस्त्यावर आंदोलन केले. ज्या पबमध्ये फालतू धंदे चालतात ते पब बंद करा,
सगळे पब बंद केले तर घर चालवायला पैसे कुठून आणणार, ही कारवाई चुकीची असल्याचे हे कर्मचारी आणि मालक म्हणत आहेत.

पुण्यात रस्त्यावर उतरलेले हे पब, बार, रेस्टॉरंट चालक मालक शांततेत आंदोलन करत आहेत.
या सर्व पब आणि ह़ॉटेल्समध्ये साधारण अडीच हजार कामगार काम करतात. आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sindhudurga Boat Accident | उजनी पाठोपाठ सिंधुदुर्गात बोट दुर्घटना! बर्फ घेऊन जाणारी बोट उलटल्याने दोघांचा बुडून मृत्यू, 2 जण बेपत्ता?

Dombivli MIDC Blast | डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मालकांविरोधात गुन्हा दाखल, एकुण जखमींची नोंद आली समोर

Porsche Car Accident Pune | पोर्शे कार अपघात : शिंदे, फडणवीस, अजित पवारांना फोन लावला तर सगळं मिटेल, अग्रवाल कुटुंबियांपैकी एकाची पोलीस आयुक्तालयातच अरेरावी (Videos)

Kothrud Pune Crime News | कोथरूडमध्ये नोकराच्या प्रसंगावधानाने फसला दरोड्याचा प्रयत्न; तीन दरोडेखोर जेरबंद (Videos)