Pulses and Oilseed Price Hike | यंदाच्या कमी पावसामुळे डाळी आणि तेलबिया महागणार; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

पोलीसनामा ऑनलाइन – Pulses and Oilseed Price Hike | सध्या राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील पावसाची अपेक्षा आहे. ऑगस्टाचा महिना संपत आला तरी देखील अद्याप श्रावणधारा बरसल्या नाहीत. ही बाब चिंतादायक ठरत असून यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. शेतीची पेरणी झाली असली तरी देखील मुबलक पाऊस (Maharashtra Rain) न झाल्याने पिकांनी देखील मान टाकली आहे. हवामान खात्यानुसार (India Meteorological Department), या वर्षी ऑगस्टमध्ये मागील 8 वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यावर्षी झाली आहे. कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता शेतमालावर दिसून येत असून त्यामुळे महागाई देखील वाढणार आहे. कमी पर्जन्यामुळे डाळी आणि तेलबियांचे भाव वाढू शकतात (Pulses and Oilseed Price Hike) आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये थोड्या हलक्या सरी बरसल्यानंतर अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. शेतकरी देखील अगदी चातकाप्रमाणे पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कडधान्ये आणि तेलबियांची पेरणी केली आहे. या पेरणीला आता लवकरच कोंब फुटतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र पाऊसच पडत नसल्याने याचा परिणाम शेतीवर होत आहे. या पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण होणाऱ्या पाण्याच्या कमतरतेमुळे डाळी आणि कडधान्यांची पिके घेणे शेतकऱ्याला शक्य होत नसल्याचे समोर येत आहे. मान्सूनची प्रतिक्षा (Awaiting Monsoon) ही कायम असून पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये (Monsoon September Update) देखील ती कायम राहणार आहे. पाऊसाचे प्रमाण El Nino फॅक्टरमुळे कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी आता कडधान्य व तेलबिया यांच्या किमतीमध्ये वाढ होणार असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.

आपल्या देशात जून महिन्यापासून खरीप हंगाम (Kharif season) सुरु होतो. जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या या खरीप हंगामामध्ये कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन अशी काही ठराविक पिके घेतली जातात. मात्र या पिकांची वाढ ही हा महिन्यांमध्ये होणाऱ्या पावसावर ठरत असते. कमी किंवा जास्त पावसाचा फटका हा खरीप पिकांना होतो आणि वर्षभर या पिकांच्या किमती उंची गाठतात. यावेळी देखील हिच परिस्थिती निर्माण झाली असून डाळी व तेलबियांच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे.

मागील वर्षीच्या अर्थिक वर्षामध्ये अर्थात 2022-23 मध्ये भारतातील अन्नधान्य उत्पादनात वार्षिक आधारावर 5 टक्के
वाढ नोंदवण्यात आली होती. यामध्ये 330.5 मिलियन टन (MT) उत्पादन वाढले आहे.
मात्र यावर्षीचा कमी पाऊस हा शेतकऱ्यसाठी चिंतेची बाब ठरत असून अन्नधान्य उत्पादनावर देखील परिणाम करत आहे.
दररोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या कडधान्य व डाळी महाग झाल्याने सामान्य लोकांच्या खिशाला कात्री
बसणार आहे. हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार, संपूर्ण देशात मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑगस्ट
महिन्यात 35 टक्के कमी पाऊस झाला आहे. अशा स्थितीत सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी एवढी
मोठी तूट भरून काढणे कठीण होऊ शकते. त्यामुळे कडधान्य व तेलबिया (Pulses and Oilseed Price Hike)
यांच्या किमती वाढणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Tata Stock | टाटा समुहाच्या या अनामित शेअरची कमाल, ३ वर्षात १२०० टक्केपेक्षा जास्त उडी