Pune : 2 सख्या अल्पवयीन भावांकडून पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंबेगाव बुद्रुक परिसरात दोन सख्या अल्पवयीन भावांनी पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी जखमी मुलाच्या 43 वर्षीय आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीनावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच परिसरात ही मुल राहतात. दरम्यान काही महिन्यांपूर्वी जखमी मुलाचे मित्रासोबत वाद झाले होते. यावेळी जखमी मुलाने त्या मित्राला या दोघांना दाखवले होते. याचा राग होता. तर दोन दिवसांपूर्वी तिघेजण शिवरत्न चौकातील भैरवनाथ मंदिराच्या मागे सिगारेट ओढत बसले होते. यावेळी वाद लढत या मुलावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.