पुणे : बेकायदा वास्तव्य करणा-या ३६ बांग्लादेशींना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणा-या ३६ बांग्लादेशीय नगारिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज (शनिवार) दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

पोलिसांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत, दौंड, बारामाती तालुका, वडगांव निंबाळकर या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कारवाई करुन ३६ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे जिल्ह्यात वस्तव्यास होते. बांग्लादेशी नागरिकांना बेकायदीश रित्या भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी देखील दहशदवाद विरोधी पथकाने पुणे आणि परिसरातून बांग्लादेशींना अटक केली होती. मार्च महिन्यात केलेल्या कारवाईत तीन बांग्लादेशींना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले बांग्लादेशी नागरीक बांग्लादेशातील दहशदवादी संघटना अन्सारउल्ला बांगला टिम (ABT) या संघटनेशी संबंधीत होते. हे तिनही बांग्लादेशी घुसखोरी करुन भारतात आले होते. दहशतवाद विरोधी पथकाला याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वानवडी आणि आकुर्डी परिसरातून त्यांना अटक केली होती. या तिघांकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त करण्यात आले होते.