Pune ACB Demand Case | पुण्यातील महावितरणची महिला सहाय्यक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर, 12 हजाराच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Demand Case | पुण्याच्या धानोरी येथील (Dhanori) महावितरण कार्यालयातील (Pune Mahavitaran News) महिला सहाय्यक अभियंत्यावर (Women Assistant Engineer) 12 हजार रूपयाच्या लाच मागणी प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून Anti Corruption Bureau Pune (Pune ACB) विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला अभियंत्याने 20 हजार रूपयाची सुरूवातीला मागणी करून तडजोडीअंती 12 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. (Pune ACB Demand Case)

 

हर्षाली ओम ढवळे Harshali Om Dhawale (38, पद – सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय, धानोरी शाखा, पुणे) असे लाचेची मागणी करणार्‍या महिला सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे लायझनींगच्या कामासाठी विद्युत ठेकेदाराकडे नोकरीस आहेत. ग्राहकाचे वीज मीटरची मंजुरी मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करून महावितरण धानोरी शाखा कार्यालयात ते गेले होते. त्या कार्यालयातील सहाय्यक अभियंता हर्षाली ढवळे यांनी यापुर्वी केलेल्या 3 थ्री फेज कामाचे व सध्याचे 1 फेजचे वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी सुरूवातीला 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Pune ACB Demand Case)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक अभियंता हर्षाली ढवळे (Assistant Engineer Harshali Dhawale) यांनी यापुर्वी केलेल्या 3 थ्री फेज विद्युत मीटर कामाचे व सध्याचे 1 थ्री फेजचे प्रलंबित वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी तडजोडीअंती प्रत्येकी 3 हजार रूपये याप्रमाणे 12 हजार रूपयाची लाच मागितली (Pune Bribe Case) हे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap)

 

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav) यांनी सांगितले आहे.

 

Web Title :  Pune ACB Demand Case | Case Against Dhanori Mahavitaran Assistant Engineer
Harshali Om Dhawale In Bribe Demand Of 12000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा