Pune ACB Trap | 10 हजाराची लाच घेणारा मावळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | 12 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Pune Bribe Case) करून 10 हजार रूपये लाच म्हणून घेणार्‍या मावळ तालुक्यातील (Maval Taluka) ग्रामविकास अधिकार्‍याला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Pune Crime News). त्याच्याविरूध्द कामशेत पोलिस ठाण्यात (Kamshet Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap)

विलास तुकाराम काळे Vilas Tukaram Kale (46, ग्रामविकास अधिकारी – Gamvikas Adhikari, ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे आईच्या नावावर खरेदी केलेल्या जागेवर पत्र्याचे शेडची नोंद ग्रामपंचायत खडकाळे – कामशेत येथे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांची भेट घेतली होती. ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांनी 8 अ उतार्‍यावर नोंद करण्यासाठी सुरूवातीला 12 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तात्काळ पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. (Pune ACB Trap)

ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती स्विकारली.
त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्याविरूध्द कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shreeram Shinde) करीत आहेत.

Web Title :-   Pune ACB Trap | Gramvikas Adhikari Vilas Tukaram Kale of Maval taluka who took a bribe of 10 thousand in the net of pune anti-corruption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले, रामदास आठवलेंचा मिश्कील टोला

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते न्हावरा ते चौफुला रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील 329 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन