Ramdas Athawale | एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले, रामदास आठवलेंचा मिश्कील टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मातोश्रीवर येऊन रडले असा दावा आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) केला आहे. यावरुन शिंदे गटाने (Shinde Group) आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच युतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही (Ramdas Athawale) त्यांच्या शैलीत ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. एकनाथ रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले अशी चारोळी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हणत प्रत्युत्तर दिले.

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, आदित्य ठाकरे, म्हणतात, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, म्हणूनच उद्धव ठाकरे तोंडावर पडले, रडण्याचा विषय नाही. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही. तो खरा शिवसैनिक (Shiv Sainik) आहे. बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) अनुयायी आहे. रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणं चुकीचं आहे. एकतर भाजपला (BJP) सोडून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) त्यांनी आघाडी केली म्हणून शिंदेंनी बंड केले असं रामदास आठवले म्हणाले.

अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर

राज्यात अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
यावरुन रमदास आठवलेंना विचारलं असता, अजित पवार भाजपात जातील असं वाटत आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी यापूर्वी शपथ देखील घेतली होती.
मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल.
त्यांच्यासोबत आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती संधी आम्ही अजित पवारांना देऊ,
आठवले यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Web Title :- Ramdas Athawale | ajit pawar and ramdas athavale news ramdas athawale offer to ajit pawar party joins

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Pune Collector Dr. Rajesh Deshmukh Marathi | मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील 329 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन