Pune ACB Trap News | सात बारावर नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात; तलाठ्यासह खासगी व्यक्तीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune ACB Trap News | आजोबांनी बक्षीसपत्र म्हणून दिलेल्या जमिनीची नोंद सात बारावर करण्यासाठी ५ हजारांची लाच (Accepting Bribe Case) घेताना तलाठी व त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap News) सापळा रचून पकडले.

तलाठी निलेश सुभाष गद्रे Talathi Nilesh Subhash Gadre (वय ४२, रा. सजा सोनोरी, ता. पुरंदर) आणि खासगी व्यक्ती आदित्य मधुकर कुंभारकर Aditya Madhukar Kumbharkar (वय २१, रा. वजपुरी, ता. पुरंदर) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत एका ३२ वर्षाच्या शेतकर्‍याने तक्रार दिली होती. त्यांच्या आजोबांनी तक्रारदार यांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती. या बक्षीसपत्राची नोंद सात बारा उतार्‍यावर करण्यासाठी तक्रारदार यांनी सजा सोनोरी तलाठी कार्यालयास (Sonori Talathi Office) अर्ज दिलेला होता. तलाठी निलेश गद्रे याने तक्रारदार यांच्याकडे बक्षीसपत्राची नोंद सात बारावर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच (Pune Bribe Case) मागितली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे Anti Corruption Bureau Pune (Pune ACB) त्यांनी तक्रार केली.
लाच लुपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केल्यावर पुरंदर तालुक्यातील दिवे गाव येथील तलाठी कार्यालयात
सापळा रचला. तक्रारदारांकडून आदित्य कुंभारकर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात
आले. पाठोपाठ तलाठी निलेश गद्रे याला ताब्यात घेण्यात आले. सासवड पोलिस ठाण्यात (Saswad Police Station)
गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (PI Pravin Nimbalkar)
तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case News | 5 हजाराच्या लाच प्रकरणी पुरंदर तालुक्यातील तलाठी अन् पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | आई व मुलीला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण, खडकीतील प्रकार; एकाला अटक

Ananya Panday Airport Look | अनन्या पांडेच्या कॅज्युअल एअरपोर्ट लूकनं चाहत्यांच वेधलं हृदय…!