Pune ACB Trap Case News | 5 हजाराच्या लाच प्रकरणी पुरंदर तालुक्यातील तलाठी अन् पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap Case News | बक्षीसपत्राची नोंद सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी 5 हजार रूपयाची लाच घेताना पुरंदर तालुक्यातील सजा सोनोरीमधील तलाठी आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहेत. (Pune ACB Trap Case News)

तलाठी निलेश सुभाष गद्रे Nilesh Subhas Gadre (42, पद – तलाठी, सजा – सोनोरी ता. पुरंदर, जि. पुणे) आणि आदित्य मधुकर कुंभारकर Aditya Madhukar Kumbharkar (21, रा. वजपुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या आजोबांनी तक्रारदारांना बक्षीसपत्राने 39 गुंठे जमीन दिली होती. सदरील बक्षीसपत्राची नोंद सातबारा उतार्‍यावर करण्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केला होता. तलाठी निलेश गद्रे यांनी त्यांच्याकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Pune ACB Trap Case News)

दरम्यान, तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली.
आरोपी आदित्य कुंभारकर यांनी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रूपयाची लाच तलाठी गद्रे यांच्यासाठी घेतली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना देखील ताब्यात घेतले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 35 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

Pimpri PCMC News | पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे कुणबी जात प्रमाणपत्राच्या कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

पुण्यातील कलवड वस्तीत 25 वाहनांची तोडफोड, तीन आरोपी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात