Pune ACB Trap On API | 1 लाख 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर (API) एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap On API | दाखल गुन्ह्राचा अ फायनल पाठविण्यासाठी सुरूवातीला 50 हजार रुपये लाचेची मागणी अन् नंतर 1 लाख 40 हजार रूपयांची मागणी करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. देविदास हिरामण करंडे (Devidas Hiraman Karande) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एपीआय करंडे (API Devidas Karande) यांच्यावर शुक्रवारी (दि.6) सायंकाळी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune ACB Trap On API)

याबाबत 38 वर्षाच्या महिलेने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध ऑगस्ट 2022 मध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्राचा तपास एपीआय देविदास करंडे हे करीत होते. करंडे यांनी तक्रारदार यांचेकडे या गुन्ह्याचा अ फायनल पाठविण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात एपीआय करंडे लाच मागत असल्याची तक्रार केली. (Pune ACB Trap On API)

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची 23 व 26 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली.
त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक देविदास करंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे व त्यांच्यासोबत असलेल्या सहआरोपीच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा अ फायनल पाठवण्यासाठी लाचेची मागणी केली. एपीआय करंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार तर सहआरोपी यांच्याकडे 1 लाख असे एकूण 1 लाख 40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार पुणे एसीबीने देविदास करंडे यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (Lonavala City Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार सुनील सुराडकर, भुषण ठाकुर,
रियाज शेख, चालक दिपक दिवेकर यांच्या पथकाने केली

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Caste Wise Census | बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश