Pune ACB Trap | पुणे : लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | कंपनीचा विद्युत भार वाढवून देण्यासाठी 45 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या महावितरण कंपनीच्या भोसरी शाखेतील (Mahavitaran Bhosari) सहायक अभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.30) भोसरी गावातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात करण्यात आली. किरण गजेंद्र मोरे Kiran Gajendra More (वय-33) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. (Pune Bribe Case)

याबाबत 47 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली होती. तक्रारदार हे फ्रेंड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे सर्व कामकाज पाहतात. तक्रारदार यांच्या कंपनीला राईस कंपनीचे विद्युत भार वाढवून देण्याचे काम मिळाले होते. विद्युत भार वाढवण्यासाठी तक्रारदार यांनी भोसरी गावातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर पुढील कार्यवाही करण्याचे काम किरण मोरे यांच्याकडे होते. मोरे यांनी काम करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली.(Pune ACB Trap)

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता किरण मोरे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 45 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार पथकाने मंगळवारी भोसरी गावातील महावितरण कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून 45 हजार रुपये लाच स्वीकारताना किरण मोरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
मोरे याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार