Pune Accident News | भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील वाहनाची धडक बसून एका 24 वर्षीय तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला (Pune Accident News). ही घटना बुधवारी (दि.10) सकाळी आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) आळंदी फाटा येथील गंधर्व हॉटेल जवळ घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सुरज रामकेवल प्रजापती (वय-24 रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सुरज याचे वडिल रामकेवल बिपत प्रजापती (वय-55 रा. दिलावलपुर, ता. सलवन, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश) यांनी शुक्रवारी (दि.12) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात वाहन चालकावर आयपीसी 279, 304(2), 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुरज हा गंधर्व हॉटेल जवळ पायी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी चाकण बाजून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, निष्काळजीपणे तसेच जोरात चालवून सुरजला धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक न थांबता निघून गेला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना महाळुंगे पोलिसांकडून अटक, एक किलो सोने जप्त

Sharad Mohol Murder Case | …तर शरद मोहोळचा ‘गेम’ झाला नसता, कटात सामील न झाल्याने पोळेकरकडून भूगावमध्ये एकावर गोळीबार

Dr Sanjeev Thakur | ललित पाटील प्रकरण : ससून रूग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांना पुरावे मिळाले, अटक होणार?

Eknath Shinde Group | शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य, ”ठाकरे गट पुन्हा फुटणार, १४ तारखेला काय होतंय पहा…”

Uddhav Thackeray | घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान, पंतप्रधानांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ”गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय…”

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळच्या खूनासाठी मदत करणाऱ्या आणखी तिघांना अटक

Pune: Constructor Ended His Life Following Moneylender’s Constant Harassment; Complaint Against Accused for Instigating Suicide