Pune Pimpri Chinchwad Crime News | कोथरुड येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू, तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना कोथरुड परिसरातील किष्कींदानगर येथील तिरुपती अपार्टमेंट येथे 13 जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

रघुनाथ रामा (वय-44) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार रामराव आडगळे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन बापू निवृत्ती वाघमारे (वय-40), पांडूरंग उर्फ संतोष महादेव दांड (वय-34), राजेश राजेंद्रप्रसाद यादव (वय-40) यांच्यावर आयपीसी 304अ, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

कोथरुड येथील किष्कींदानगर येथील सर्व्हे नं. 120 येथे तिरुपती अपार्टमेंटच्या इमारतीचे काम सुरु आहे. इमारतीच्या बांधकामावर काम करत असताना पहिल्या मजल्यावर असलेल्या स्लॅबच्या डक्टला आरोपींनी कोणत्याही प्रकराची सुरक्षा जाळी लावली नाही. तसेच डक्टभोवती कोणताही सुरक्षा ग्रील लावले नाही. त्यामुळे त्या डक्टमधून रघुनाथ रामा खाली पार्कींमगध्ये पडले. आरोपींनी काम करत असताना कामगारांना हेल्मेट देणे गरजेचे होते. मात्र आरोपींनी हेल्मेट न पुरवल्यामुळे रामा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपींच्या हयगयीमुळे रघुनाथ रामा यांचा मृत्यू झाल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार आडगळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police ACP Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

Pune Police Officer Suspended | 5 लाखाचे लाच प्रकरण ! वकीलाला लाच घेण्यासाठी प्रोत्साहित करणारा पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबीत